मल्हार गड


महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला म्हणून 'मल्हारगड' प्रसिद्ध आहे.

पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्यामूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका डोंगररांगेवर राजगडआणि तोरणा आहेत. दुसरी डोंगररांग ही पूर्व-पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड हे किल्ले याच रांगेवर आहेत. पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती इ.स. १७५७ ते १७६० या काळातील आहे. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला 'सोनोरी' म्हणूनही ओळखले जाते.
पुण्यापासून मल्हारगड सुमारे ३५ किलोमीटर दूर आहे. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान आहे.


दिनांक 6 जानेवारी 2019 उजाडला.सकाळचे 8 वाजले होते, रविवार उजाडून बराच वेळ झाला होता, आजचा दिवस वाया जाऊ देयचा नाही म्हणून,गुगल महाराज्यांकडून माहिती मिळऊ लागलो,पुण्या भोवतालची ऐतिहासिक ठिकाण शोधू लागलो,आणि हाकेच्या अंतरावर "मल्हार गड" तयारच होता.

  मग काय 4 ते 5 मित्रांना लगेच फोन केले पण अचानक ठरलेल्या ट्रेक साठी एक मित्र (सुमित) सोडून बाकी कोणीही येण्यास तयार न्हवतं.तासाभरात आवरून निगायचे ठरले.

   तासाभरात सगळं आवरून बुलेट ला कीक मारली अन थेट सुमित च घर गाठलं, साहेब रेडी होऊन बाहेरच वाट बगत थांबले होते.जास्त वेळ न घालवता आम्ही गाडी पहिली चहा च्या दुकानावर वळवली,मस्त 2 कप चा पिऊन आम्ही थेट गाडी दिवे घाटा कडे कूच केली.पुणे-कोंढवा रस्त्याची पूर्ण पणे वाट लागली होती त्यामुळे गाडीचा वेग ही कमी होता, आम्हाला 35 किमी अंतरा साठी 1 ते 1.30 तास वेळ गेला.

  खराब रस्ता संपला आता दिवे घाटाला सुरवात झाली,हीच ती वाट जिथे ज्ञानोबा-माऊलींच्या अखंड नाम घोषाने पायात संचारलेल्या बळाच्या जोरावर आपल्या संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या नागमोडी वळणाचा चार किमी चा अवघड दिवे घाट लीलायापार होऊन जातो, दिवे घाट संपताच आम्ही वारी मधून बाहेर पडल्याडरखे वाटले.

घाट संपताच डावीकडे टेकडी वरून आपणास मस्तानी तलावाचे दर्शन होते.

मस्तानी तलाव हा दिवे घाटाच्यापायथ्याशी असलेला वडकी गावाजवळचा एक तलाव आहे. या तलावाला छत्रसाल राजाची कन्या आणि बाजीराव पेशव्यांची पत्‍नी मस्तानी (मृत्यू - इ.स. १७४०) हिचे नाव देण्यात आले आहे.

   दिवेघाट संपल्यावर काही वेळाने डावीकडे झेंडेवाडी गावाचा फाटा लागतो. तेथून २ कि.मी.वर झेंडेवाडी आहे. गाव पार करून आपल्याला समोरच्या डोंगररांगांमध्ये दिसणाऱ्या 'ण' आकाराच्या खिंडीत जावे लागते. या खिंडीत गेल्यावर समोरच आपल्याला मल्हारगडचे दर्शन घडते. खिंडीतून किल्ल्यावर जाण्यास अर्धा तास लागतो. झेंडेवाडी फाट्यापासून खिंड पार करून किल्ल्यावर जायला साधारणपणे दीड तास लागतो.


 गडाच्या पायथ्याशी गाडी लावून , आम्ही चढाईला सुरवात ,चढाई तशी सोपीच होती 15 ते 20 मिनिटात आम्ही चोर दरवाजा जवळ येऊन पोहचलो.





चोर दरवाजा द्वारा जवळ सुमित आणि मी.
गडावरील बघण्याची ठिकाणे
                                    सदर
                   सदरे वरून दिसणारे दोन्ही मंदिर
 खंडोबा मंदिर
 शंकराचं मंदिर
 मुख्य दरवाजा (सोनेरी दरवाजा  )
 गडाचे शिल्लक राहिलेले बुरुज


 गडाचे इतर दरवाजे खलील प्रमाणे








कालांतराने पडझड झालेली किल्याची तटबंदी

 किल्ला बघून झाल्यावर आम्ही परतीच्या मार्गाने परत आलो, सकाळ पासून काही खाल्लं नसल्या मुळे पोटात भुकेने कावळे ओरडत होते मग काय हायवे ला लागताच हॉटेल मध्ये मस्त जेवण केले, आणि मोहन नगरला चहा घेऊन ट्रेक चा निरोप घेतला.




    गडावरील आमचे काही क्षण 













































Comments